मुंबई – महान्यूज लाईव्ह
संभाजी भिडे या गृहस्थाने राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केले, अशा व्यक्तीला तातडीने अटक करा. असली वक्तव्ये एकदाच नाही, सातत्याने केली जात आहेत, अशी व्यक्ती बाहेर मोकाट कशी फिरू शकते? अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात संतापजनक प्रतिक्र्या व्यक्त केली आणि विरोधी सगळेच आमदार उठून उभे राहीले.
संभाजी भिडे यांच्यावरून आज विधानसभेच्या अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर माहिती घेऊन त्यांनी केलेले वक्तव्य तपासून कार्यवाही करण्याचे आदेश देऊ असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही काही काळ गदारोळ थांबला नाही.
संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्याबद्दल अवनानकारक वक्तव्य केले. महात्मा गांधी यांचे वडीलांचे नाव मोहनदास असले, तरी त्यांचे खरे वडील हे मुस्लीम जमीनदार होते असे संतापजनक वक्तव्य केले. त्यावरून राज्यातही संताप व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद आज विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले.