जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : भोर तालुका खरेदी विक्री संघावर काँग्रेस पक्षाची एकहाती निर्विवाद सत्ता असून आज या संघाच्या स्वीकृत संचालकपदी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नथुराम दामगुडे यांची निवड करण्यात आली.
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. स्वीकृत संचालक म्हणून निवड झाल्यानंतर आमदार संग्राम थोपटे यांनी दामगुडे यांचा सत्कार केला.
यावेळी भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवळे, भोर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दामगुडे, भोर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे,
उपाध्यक्ष अतुल शेडगे, संचालक संपत दरेकर, विठ्ठलराव खोपडे, विजय शिरवले, नरेश चव्हाण, प्रमोद थोपटे, दत्तात्रय जाधव, दीपक गायकवाड, प्रदीप पिलाने, दीपक कुमकर, मोहन बांदल, संदीप कंक, मनोहर बांदल, सुभाष सुतार, नवनाथ दामगुडे, जयवंत थोपटे, संजय तळेकर, विश्वनाथ दामगुडे, संजय वाडकर , सोपान शिंदे, दिनकर कुडपणे आदी उपस्थित होते.