बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीने आज २ हजार कोरोनाग्रस्तांचा टप्पा ओलांडला. २ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या अवघ्या ११ दिवसांत बारामती तालुक्यात नवे १ हजार कोरोनाग्रस्त आढळले आहेत. थोडक्यात कोरोनाचा गुणाकार सुरू असून येत्या सोमवारी म्हणजे उद्या बारामती तालुक्यातील तीन गावांमध्ये अॅक्टिव्ह सर्व्हे होणार आहे, त्याचा विचार करता येणाऱ्या दोन दिवसांत रुग्ण आणखी वाढू शकतील, मात्र त्यामुळे तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचे प्रमाण नेमके कसे आहे, विनालक्षणाचे रुग्ण किती प्रमाणात आहेत याचा अंदाजही येण्यास मदत होणार आहे.
आज बारामतीतील रुग्णसंख्या २ हजार ५५ झाली. कालच्या तपासणीतून ८४ जण नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये शासकीय प्रयोगशाळेतील आढळलेल्या नमुन्यांमध्ये ४५ जण कोरोनाबाधित आढळले. अॅंटिजेन चाचण्यांंमध्ये ४० जण आढळले. बारामतीतील मृतांची संख्याही आज ५५ वर पोचली. काल एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सध्या बारामतीत चाचण्या वाढल्या आहेत. काल दिवसभरात ४०५ जणांची तपासणी झाली. या व्यतिरिक्त बारामती शहरातील दोन खासगी प्रयोगशाळा, नीरा येथील प्रयोगशाळा यांनीही तपासण्या सुरू केल्या आहेत. त्यांचे अहवाल अजून हाती आलेले नाहीत.
काल बारामतीत तपासणी झालेल्या शासकीय प्रयोगशाळेतील आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पाटस रोड येथील ६५ वर्षीय पुरूष, त्रिमुर्तीनगर येथील २५ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येथील २२ वर्षीय पुरूष, मोरगाव रोड येथील ३४ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ६५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
बोरावके वस्ती येथील ३८ वर्षीय पुरूष, व्हील कॉलनी येथील ३० वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ६० वर्षीय महिला, ढवाणगल्ली येथील ४५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
डोर्लेवाडी येथील १० वर्षीय मुलगी, माळेगाव येथील २८ वर्षीय पुरूष, भिगवण रोड येथील ७० वर्षीय पुरूष, अवचट इस्टेट येथील ३१ वर्षीय पुरूष, संभाजीनगर येथील ६५ वर्षीय पुरूष, शिुर्सूफळ येथील २ वर्षीय मुलगा, १८ वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
मळद येथील ७ वर्षीय मुलगा, होळ येथील ६० वर्षीय पुरूष, शिरवली येथील ४० वर्षीय महिला, सस्तेवाडी येथील ५२ वर्षीय महिला, झारगडवाडी येथील ४१ वर्षीय पुरूष, पणदरे येथील २१ वर्षीय युवती, ५६ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
करंजे येथील ४३ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील १४ वर्षीय युवती, ४५ वर्षीय पुरूष, मळद येथील ३० वर्षीय पुरूष, निरावागज येथील ५० वर्षीय पुरूष, कांबळेश्वर येथील ३० वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
निरावागज येथील ६० वर्षीय महिला, ४४ वर्षीय पुरूष, खांडज येथील ४० वर्षीय महिला, सोरटेवाडी येथील ५२ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ५५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.











