बारामती : महान्यूज लाईव्ह
आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व बीरसा ब्रिगेड सह्याद्री या संघटनांनी स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून जागतिक आदिवासी दिनानिमित्त “डॉक्टर गोविंद गारे स्मृती व्याख्यानमाला” यांचे आयोजन करण्यात आले.
कोरोनामुळे सर्वच शहरांमध्ये लॉक डाऊन असल्याने स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना क्लास अटेंड करता येत नाही. म्हणून आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व बीरसा ब्रिगेड सह्याद्री या संघटनांनी स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.
22 ऑगस्ट रोजी डॉ. सुधीर जाखोरी व मुरलीधर बांडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा व आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. 30 ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी राजू नंदकर व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गोरक्ष कोरडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा व प्रशासनातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले. 4 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड व तहसीलदार कल्पेश जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा तयारी व अभ्यास नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही व्याख्याने सुरूच राहणार असल्याचे आदिवासी विचार मंचाचे कार्यकर्ते शंकर घोडे यांनी सांगितले.










