मुंबई – महान्यूज लाईव्ह
पाटेगाव- खंडाळा- कर्जत- अहमदनगर एमआयडीसीसाठी गेल्या दोन वर्षापासून सरकारशी लढत असलेले आमदार रोहित पवार यांनी आज चक्क आंदोलन करून सरकारचेच नाही, संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले.. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनाबद्दल नापसंती व्यक्त केली, मात्र आमदार रोहित पवार यांनीही दादांनी जुने पत्र वाचले, अधिवेशनातच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले होते, याकडे लक्ष वेधले.. दरम्यान उद्याच्या संदर्भातील महत्त्वाचे बैठक होणार असून कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचा विषय मार्गे लागेल अशी चिन्हे आहेत.
आज संपूर्ण दिवसात रोहित पवारांचाच विषय गाजला. रोहित पवार यांनी चक्क छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यासमोर पायरीवर बसून आंदोलनाला सुरवात केली. त्यानंतर सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले. रोहित पवार यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांच्या मागण्या रास्त असतील तर मान्य करा अशी मागणी केली.
त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राचा उल्लेख करीत एमआयडीसीसंदर्भात पावसाळी अधिवेशनात संबंधितांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, त्यामुळे उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा असे पत्रात नमूद केल्याचे सांगितले. तसेच अजून अधिवेशन संपलेले नाही व राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिलेले आहे, तेव्हा अशा पध्दतीने आंदोलनाला बसणे योग्य नाही असा टोला मारला.
मात्र त्यानंतर रोहित पवार यांनीही दादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. एमआयडीसी चा विषय हा आजचा नाही तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली. विधानसभेतही आवाज उठवला. परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझी आपणास विनंती आहे की, उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील! असे ट्विट केले.
एकंदरीत रोहित पवारांच्या आजच्या आंदोलनाने विधानसभेच्या अधिवेशनाचा दिवस गाजला.