क्रीडा विभागाच्या चित्ररथाला तृतीय पारितोषिक
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून , क्रीडा विभागाने या चित्ररथात “चला मुलींनो खेळूया ” (Go Girl Go) या संकल्पेनेवर आधारित देखावा तयार केला होता . यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.
प्रत्यक्षात पदक मिळवलेले राष्ट्रीय खेळाडू यात सहभागी होते. या चित्ररथाने मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला. या चित्ररथावर विविध क्रिडा स्पर्धातील पदकविजेते सहभागी झाले होते. मुलींनी मल्लखांब, जिम्नॅस्टीकसह विविध क्रिडा प्रकारांचे सादरीकरण केले. या चित्ररथाने व त्यावरील सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यात सर्वच खेळाडूंनी बहारदार सादरीकरण करुन मान्यवरांसह उपस्थितांची मने जिंकली










