फलटण – महान्यूज लाईव्ह
निरा डाव्या कालव्यापाठोपाठ उजव्या कालव्याच्या भागातही निरा उजवा कालवा अस्तरीकरणाच्या विरोधात शेतकरी एकवटले. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा विरोध आक्रमक होत चालला होता. आज तालुक्याच्या विविध गावांमधून लोकांनी आपापले ट्रॅक्टर घेऊन भव्य रॅली काढत शेतकऱ्यांची ताकद प्रशासनाला दाखविण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांनी केवळ ट्रॅक्टर मोर्चाच काढला नाही, तर तालुक्यातील आठ गावांनी या आंदोलनाला भरभक्कम प्रतिसादही दिला. शेती वाचली, तर गावे वाचतील या धोरणातून या आठ गावांनी उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवले.
तालुक्यातील साखरवाडी, मुरूम, सुरवडी, रावडी खुर्द व बुद्रुक, खामगाव, होळ, निंभोरे, कुसूर, पाडेगाव, चौधरवाडी, तरडगाव, काळजसह अनेक गावांनी मुळातच या अस्तरीकरणाच्या विरोधात निषेधाचे ठराव मंजूर केले होते. आज आठ गावांतील व्यवहारही बंद ठेवले.