पुणे – महान्यूज लाईव्ह
मुंबई पोलिसांना दादर रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची निनावी माहिती मिळाली आणि पोलिसांची धावपळ उडाली. हा फोन पुण्याच्या नियंत्रण कक्षाला आला होता. मग पोलिसांनी दादर रेल्वेस्थानकाची कसून चौकशी केली. मात्र कोठेच संशयास्पद आढळले नाही. मग फोन कुठून आला याची चौकशी केली, तर लोणीकाळभोर येथून आल्याचे तांत्रिक तपासात दिसले..
पुणे पोलिसांनी मग तांत्रिक विश्लेषण करीत हा फोन क्रमांक कोणाचा याचा शोध घेतला. तो योगेश ढेरे या नावाचा असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी लोणीकाळभोर येथे येऊन योगेश ढेरेला ताब्यात घेतले. अटक केली. मग पोलिस तपासात त्याने जी माहिती दिली, त्यावरून पोलिस ही चक्रावले.
योगेश ढेरे हा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. काही नाही, फक्त लोक घाबरावेत, त्यांची धावपळ उडावी म्हणून हा फोन केल्याचे त्याच्याकडील चौकशीतून दिसले. दरम्यान त्याचा पाच वर्षापूर्वी अपघात झाला, त्यात त्याच्या डोक्याला मार लागला होता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितल्यावर पोलिसांना आणखीच एक धक्का बसला.