बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी विजय काकडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यार्थी विकास मंडळ यांचे अंतर्गत पुणे जिल्हा ग्रामीण विभागासाठी जिल्हा समन्वयक म्हूणन पुढील 3 वर्षांसाठी निवड करण्यात आली. सध्या विद्यार्थी मंडळाचा अतिरिक्त भार सांभाळत असलेले डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी नुकतेच काकडे यांना जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्याचे पत्र दिले.
मागील 3 वर्षांत विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून काम करताना विजय काकडे यांनी महाविद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना यशस्वीपणे राबाविली. त्यासोबतच विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद इत्यादीसाठी विद्यापीठाकडून मोठया प्रमाणावर अर्थसहाय्य प्राप्त केले तसेच स्वररंग या विभागीय पातळीवरील युवक महोत्सवाचे यशस्वी आयोजन विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी विजय केले. काकडे यांच्या या कार्याची दाखल घेऊनच त्यांची या पदावर निवड झाली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी या निवडी बद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्या प्रतिष्ठान परिवार व महाविद्यालयातील सर्व घटकांच्या वतीने विजय काकडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.