शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या देखील बदल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या असून, या पोलीस निरीक्षकांना तातडीने दिलेल्या ठिकाणी नियुक्त होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एका ठिकाणी दोन वर्षे सेवा बजावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आलेल्या आहेत, असे कारण यामागे देण्यात आले आहे. मात्र घाऊक बदल्यांचा विचार करता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत याचीच चर्चा आता रंगली आहे.
पहा कोणाच्या बदल्या कोठे?
पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या बदलांमध्ये कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय जगताप यांची शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांची राजगड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची रांजणगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांची मंचर पोलीस ठाण्यात, तर राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांची सुरक्षा शाखेत, तर मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होळकर यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. सुरक्षा शाखेतील पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांची सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून, तर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांची जेजुरी पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या नियंत्रण कक्षात असलेले व नव्याने हजर झालेले आठ पोलीस निरीक्षक नव्याने विविध ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक बबन पठारे यांची नियंत्रण कक्षात, अण्णा पवार यांची आर्थिक गुन्हे शाखेत, ललित वर्टीकर यांची नियंत्रण कक्षात, रवींद्र पाटील यांची कामशेत पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी, कुमार कदम यांची वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी, दिनेश तायडे यांची बारामती शहर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी, सुभाष चव्हाण यांची नियंत्रण कक्षात तर राजेश गणेश गवळी यांची पोलीस कल्याण शाखेत बदली करण्यात आली आहे.
सूर्यकांत देवराव कोकणे यांचे नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक म्हणून, तर सुहास लक्ष्मण जगताप यांची जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शंकर पाटील यांची भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून, या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने बदली झालेल्या ठिकाणी त्वरित हजर होऊन तसा अहवाल कार्यालयात सादर करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिल्या आहेत.