शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्या असून ज्या ठिकाणी दोन वर्ष कालावधी केलेला आहे, अशा अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून बदला करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले असल्याने थोड्याच दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची देखील चर्चा आता रंगू लागली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाच्या या बदल्या असून नारायणगाव पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांची बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली आहे. यवत पोलीस ठाण्यामध्ये असलेले केशव वाबळे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात, तर शिक्रापूर पोलीस ठाण्यातील नितीन अतकरे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यातच प्रशासकीय बदलीपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
सध्या बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक असलेले प्रकाश वाघमारे यांना देखील पुढील प्रशासकीय बदली पर्यंत मुदतवाढ दिली आहे. खेड पोलीस ठाण्यातील पोलीस सहायक निरीक्षक राहुल लाड यांची लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पदी, तर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सध्या सहाय्यक निरीक्षक असलेले निलेश पांडुरंग माने यांची सायबर पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली आहे.
सध्या इंदापूर पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक असलेले ज्ञानेश्वर धनवे यांची खेड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून, राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांची जेजुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. कामशेत पोलीस ठाण्यात सध्या नियुक्तीवर असलेले आकाश पवार यांची बारामती शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून, इंदापूर पोलीस ठाण्यातील महेश माने यांची यवत पोलीस ठाण्यात तर लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील संदेश बावकर यांची यवत पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
खेड विभागामध्ये वाचक असलेले सहाय्यक निरीक्षक दीपक कारंडे यांची आर्थिक गुन्हे शाखेत, तर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक महादेव शेलार यांची नारायणगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक रणजीत पठारे यांची वेल्हा पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंचर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक किरण भालेकर यांची घोडेगाव पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून, बारामती शहर जिल्हा वाहतूक शाखेकडे असलेले सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातूरे यांची नियंत्रण कक्षात, तर यवत पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक निरीक्षक माधुरी तावरे यांची हवेली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक कुलदीप संकपाळ यांची पौड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. नव्याने हजर झालेले सहाय्यक निरीक्षक किशोर शेवते यांची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात, सहाय्यक निरीक्षक सतीश पवार यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात, तर बालाजी भांगे यांची बारामती शहरच्या जिल्हा वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक अर्जुन मोहिते यांची दहशतवाद विरोधी पथकामध्ये तात्पुरता कार्यभार देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.