• Contact us
  • About us
Thursday, September 28, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर रिझर्व्ह बँकेने दिला दणका आणि वाईतील  हरिहरेश्वर सहकारी बँकेचा परवाना केला रद्द.! संस्थापक नंदकुमार खामकर अद्याप जेलमध्येच ..!

Maha News Live by Maha News Live
July 12, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, Featured
0

दौलतराव पिसाळ  : महान्यूज लाईव्ह 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्नाटकातील तूमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.  या बँकांकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने त्यांचा परवाना रद्द केल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेने ११ जुलै २०२३ पासून बँकिंग व्यवसाय करणे बंद केले आहे असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने निवेदनात नमूद केले आहे. हरिहरेश्वर सहकारी बँकेचे सुमारे ९९.९६ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्‍कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून मिळण्यास पात्र आहेत. 

या बँकांचे परवाने रद्द केल्यामुळे या बँकांना बँकिंगचा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. तसेच सध्याची आर्थिक स्थिती पाहाता या बँका त्यांच्या सध्याच्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देऊ शकणार नाहीत असेही आरबीआयने नमूद केले आहे.

 ८ मार्च २०२३ पर्यंत बँकेच्या एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी ५७.२४ कोटी रुपये आधीच दिली आहे. हरिहरेश्वर बँकेमध्ये ११२ बनावट कर्ज प्रकरणे करुन तब्बल ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३४४ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हा लेखापाल विजय सांवत यांनी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संस्थापक संचालक २९ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  

हरिहरेश्वर बँकेचे चेअरमन अजित गुलाबराव खामकर, व्हाईस चेअरमन जगन्नाथ बाजीराव सावंत, संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर, संचालक वजीर कासमभाई शेख, मनोज श्रीधर खटावकर, प्रकाश केरबा ओतारी, विलास गणपत खामकर, चंद्रकांत धर्माजी शिंदे, विष्णूपंत शंकर खरे, अर्जुन दिगंबर खामकर, जनार्दन आनंदा वैराट, किरण भास्कर कदम, सौ. जयश्री वसंत चौधरी, सौ. जयमाला विजय खामकर, तज्ञ संचालक गोविंद तुकाराम लंगडे, अरुण महादेव केळकर, संतोष शिवाजी चोरगे, व्यवस्थापक रमेश दगडू जाधव,  वाईचे शाखाप्रमुख विनोद मनोहर शिंदे, खंडाळय़ाचे शाखाप्रमुख रणजित खाशाबा शिर्के, वडूथचे शाखाप्रमुख सुनील चंद्रकांत वंजारी, भुईंजचे शाखाप्रमुख वसंत आनंदा सणस, वाई शाखेचे रोखपाल सुचित महादेव जाधव, वडूथ शाखेचे रोखपाल महेश प्रताप शिंदे, भुईज शाखेचे रोखपाल दीपक धर्माजी शिर्के, खंडाळा शाखेचे रोखपाल तानाजी मानसिंग भोसले, सनदी लेखपाल राहुल धोगंडे, डी. बी. खरात, एन.एस.कदम यांचा यामध्ये समावेश होता. 

२०११ ते ३१ मार्च २०१९ च्या दरम्यान हरिहरेश्वर डेव्रहलपर्स वाई या फर्मच्या नावाने सोनगिरवाडी येथील सर्व्हे नंबर. ७१/२ व सर्व्हे नंबर २५/१अ/२/३ या मिळकतीवर ६२ कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाणखत व कर्जप्रकरणे दाखवून बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दाखवून कर्ज घेवून बँकेची, सभासदांची व ठेवीदारांची फसवणूक केली होती.

तर सिटी सर्व्हे नंबर १२२४,२०२४, ६६५, ५८७, ३२७ सर्व्हे नंबर १०८/२ या मिळकतीवर एशियन डेव्हलपर्स या फर्मचे नावे ५० कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाण खत व कर्ज प्रकरणे दाखवून बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दाखवून बँकेतून संबंधितांच्या नावे कर्ज घेवून बँकेच्या सभासदांची व बँकेची व सभासदांची फसवणूक केली. पदाचा गैरवापर करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता सभासद, ठेवीदार यांचा विश्वासघात करुन ११२ बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेची २६ कोटी ८७ लाख ८ हजार ७८९ रुपयांचा गैरविनीयोग केला म्हणून हे गुन्हे दाखल झाले.

हरिहरेश्वर बँकेच्या २०१५-१६, २०१६-१७, २०१८-१९ या कालावधीत प्रत्यक्षात बनावट कर्ज खात्यावर रक्कमेचा भरणा न करता ११२ कर्ज खात्यावर रक्कम भरणा केल्याचे दाखवून १० कोटी २४ लाख ४२ हजार १५४ एवढ्या रकमेचा अपहार झाला. तसेच भद्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्था यांनी हरिहरेश्वर बँकेत ठेवलेल्या व परत काढून घेतलेल्या गुंतवणूकीवर बनावट ठेव तारण कर्ज प्रकरण तयार करुन ती रक्कम बँकेच्या बनावट कर्ज खात्यावर भरणा केली. पुढे भद्रेश्वर पतसंस्थेचे ठेव तारण कर्ज निरंक करण्यासाठी छ. संभाजी महाराज पतसंस्था पिंपोडे शाखा वाई, किसान नागरी सहकारी पतसंस्था वाई यांनी बँकेत ठेवलेल्या व परत केलेल्या गुंतवणूकीवर ठेवतारण कर्ज निर्माण करुन ४४ लाख ३८ हजार ४०१ रुपयांचा अपहार झाला.

हरिहरेश्वर बँक वाई या बँकेतील आर्थिक निधीचा गैरविनियोक व अपहार करुन बँकेच्या ठेवीदारांची, सभासदांची ३७ कोटी, ४६ लाख, ८९ हजार ३४४ रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली होती. यातील संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर वगळता इतर सर्वांची जमीनावर मुक्तता करण्यात आली आहे.

Next Post

रेल्वेतून होते गांजाची तस्करी! कोणार्क एक्सप्रेस मधून दोन दिवसात तब्बल ५७ किलो गांजा जप्त! दौंड रेल्वे सुरक्षा दलाची धडक कारवाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंदापूर तालुक्याच्या सुपुत्राला साखर उद्योगातील 28 वर्षाच्या अमूल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार!

September 27, 2023

आमदार दत्तात्रय भरणेंनी इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २० कोटींचा निधी केला मंजूर!

September 27, 2023

ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी रावणगावला मेंढ्या बकरीसह तीन तास रास्ता रोको आंदोलन!

September 27, 2023

संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच दोन्ही चाकं निखळली..! जेजुरीच्या देवदर्शनासाठी आले, पण तेवढ्यात रिक्षा विहिरीत पडली.. सासवडजवळ नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू!

September 26, 2023
बावनकुळेंचा चहा पत्रकार नाकारतील का ? निवडणूकांचे पॅकेज विकण्यासाठी राजकीय पक्षांच्या दारात जाणे थांबवतील का?

बावनकुळेंचा चहा पत्रकार नाकारतील का ? निवडणूकांचे पॅकेज विकण्यासाठी राजकीय पक्षांच्या दारात जाणे थांबवतील का?

September 26, 2023
भीमा पाटस कारखान्याच्या अहवालाची पाटस ग्रामस्थांनी केली होळी! सहकार महर्षी स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा अहवालात फोटो न छापल्याने संताप!

भीमा पाटस कारखान्याच्या अहवालाची पाटस ग्रामस्थांनी केली होळी! सहकार महर्षी स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा अहवालात फोटो न छापल्याने संताप!

September 26, 2023
लोणार येथे भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न! जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची उपस्थिती!

लोणार येथे भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न! जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची उपस्थिती!

September 26, 2023
पाटस पोलिस चौकीचे डॅशिंग पोलिस हवालदार “संदीप उर्फ संभाजी कदम” यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी! उपचारादरम्यान मृत्यू! अपघातात झाले होते गंभीर जखमी!

पाटस पोलिस चौकीचे डॅशिंग पोलिस हवालदार “संदीप उर्फ संभाजी कदम” यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी! उपचारादरम्यान मृत्यू! अपघातात झाले होते गंभीर जखमी!

September 25, 2023
इंदापुरातला ‘ नाचणारा घोडा ‘ आणि ‘ रेसचा घोडा ‘ कोण ? हर्षवर्धन पाटलांवर त्यांचे चुलत बंधू प्रशांत पाटलांची जळजळीत टिका !

शेटफळ तलावात पाणी सोडण्याच्या निर्णयावरून आमदार भरणे यांची श्रेय घेण्यासाठी धडपड पण…! आमदार कालवा समितीच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते.! तो निर्णय मी करुन घेतला.. हर्षवर्धन पाटलांचा दावा

September 25, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची दौंड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर! दौंड तालुकाध्यक्षपदी उत्तम आटोळे यांची बिनविरोध निवड! तालुक्यातील अनेकांना जिल्हा पातळीवरही संधी!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची दौंड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर! दौंड तालुकाध्यक्षपदी उत्तम आटोळे यांची बिनविरोध निवड! तालुक्यातील अनेकांना जिल्हा पातळीवरही संधी!

September 25, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group