म्हणाले, खोटे गुन्हे दाखल कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल…
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापुरात दोन दिवसापूर्वी विजेच्या खांबाला हात लागून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी तिच्या नातेवाईकांनी नगरपालिका कर्मचारी व महावितरण वर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह न स्विकारण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी ॲक्शन घेताच बालिका मृत्यू प्रकरणी नगरपालिकेवर दाखल केलेला गुन्हा माघारी घ्यावा अशी मागणी करत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून इंदापुर पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला.
नगरपालिकेचे कामकाज बंद करत नगरपालिकेचा मुख्य दरवाजा बंद करून नगरपालिकेच्या दारातच सर्व कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. चार दिवसापूर्वी विजेचा धक्का लागून सहा वर्षीय बालिका मृत्यू झाल्या प्रकरणी नगरपालिकेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे. दाखल केलेला गुन्हा माघारी घ्यावा अशी मागणी करत इंदापूर नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध करत काळ्या फिती लावून पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला.
इथून पुढे नगरपालिकेवर गुन्हे दाखल झाले तर आम्ही जशास तसे उत्तर देणार वेळप्रसंगी उठाव करून असा गर्भित इशारा नगरपालिकेच्या कर्मचारी दिला. या प्रकरणाच्या पाठीमागे हितचिंतक असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे.