दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील केडगाव येथील एका संस्थेत मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथे काम करणाऱ्या एका मजुराने तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.
ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. सुभाष झोरे (वय ३५ रा. केडगाव ता. दौंड जिल्हा पुणे ) असे या नराधमाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या मजुराने तीन गतिमंद मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत घटनेची माहिती मिळताच बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागाचे पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे आदींनी धाव घेत घटनेची सविस्तर माहिती घेत या घटनेची सखोल चौकशी केली. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आली असून या घटनेचा अधिक तपास पुढील दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव करीत आहेत.