• Contact us
  • About us
Saturday, June 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

११२ नंबरवर मदत मागा, काही मिनिटात पोलिस पोचतील याची खात्री – गणेश इंगळे!

tdadmin by tdadmin
July 7, 2023
in सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
११२ नंबरवर मदत मागा, काही मिनिटात पोलिस पोचतील याची खात्री – गणेश इंगळे!

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामती ही एज्युकेशन हब होते आहे, साऱ्या राज्यातील पालकांना आपला मुलगा, मुलगी बारामतीत शिकावा असे वाटते आहे. हे वातावरण असेच वाढावे, याला कसलेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. कोणतीही मदत हवी असेल तर ११२ या क्रमांकावर फोन करा. काही मिनिटातच पोलिस तुमच्या मदतीला पोचतील याची मी खात्री देतो,अशी ग्वाही बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. ते बारामतीतील कोचींग क्लासेस चालकांच्या बैठकीत बोलत होते. बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडेही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

बारामतीत शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या सतत वाढते आहे. मात्र याबरोबर आपली जबाबदारी वाढली आहे. कोणतीही चुकीची घटना या सगळ्यावर पाणी फिरवू शकते, यासाठी सर्व कोचींग क्लासेस चालकांनी सदैव सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस खात्याकडून यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलेले आहे. ते लॉज, हॉटेलची तपासणी करतात, शैक्षणिक संस्था, त्यांची हॉस्टेल येथे लक्ष ठेवतात. मध्यंतरी पोलिसांकडून शहरातील कॅफेंची तपासणी केली गेली. आतमध्ये कोण बसले आहे, हे बाहेरून दिसावे अशाप्रकारची व्यवस्था या कॅफेचालकांना पोलिसांनी करायला लावली आहे. मात्र कोचिंग क्लासेस चालकांची जी जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सुरक्षारक्षकांची सर्व माहिती पोलिसांना द्यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ड्रायव्हर, होस्टेलवर असणारे कर्मचारी यांची निवड काळजीपूर्वक करावी. याबाबतही गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी. संस्थेच्या परिसरात सीसीटिव्ही लावावेत, याचा डेटा वेळोवेळी चेक करावा. किमान ७ दिवसांचा डेटा उपलब्ध असला पाहिजे. आपल्या संस्थेत दहापेक्षा जास्त महिला कर्मचारी काम करत असल्यास संस्थेअंतर्गत लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीची समिती नेमणे कायद्याने बंधनकारक आहे. पॉस्को अॅक्टनूसार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलीचा लैंगिक छळ झाला आणि त्याची माहिती जर दिली गेली नाही तर माहिती दडपणाऱ्यावरही अजामिनपात्र गुन्हा दाखल होतो, यामुळे याबाबतही काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

९५ टक्क्यांहून जास्त विद्यार्थी आपले शिक्षण जास्तीत जास्त चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करत असतात, पण पाच सात टक्के विद्यार्थी मात्र चुकीचे वागताना दिसतात. त्यांच्या पुढील आयुष्याचा विचार करून पोलिस नरमाईची भुमिका घेतात, यामुळे काही विद्यार्थी योग्य मार्गावर येतात, पण काहींना यातच फुशारकी वाटते. ते गुन्हेगारीच्या मार्गावर पुढे चालू लागतात, असे विद्यार्थी संपूर्ण शैक्षणिक वातावरण बिघडवू शकतात. त्यामुळे याबाबत क्वासचालकांनी सदैव सावध राहण्याची गरज असल्याचे बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी यावेळी सांगितले. ११२ नंबरवर आलेल्या प्रत्येक फोनबाबत संबंधित पोलिस पथकाला अहवाल सादर करावा लागतो. बारामतीमध्ये निर्भया पथकात ८ ते १० कर्मचारी आहेत. फोन आल्यानंतर १० ते १५ मिनिटात ते जागेवर पोचतात. परंतू अजूनही या यंत्रणेचा नागरिक पुरेसा वापर करत नसल्याचेही श्री. मोरे यांनी सांगितले.

कोचींग क्लासेससाठी घरपट्टीची आकारणी ही व्यावसायिक म्हणून होते. आपल्या क्लासच्या जागेची याप्रमाणे आकारणी होते आहे, याची आपण खात्री करून घ्यावी, आपल्या जागेतील वीजजोडण्या सुरक्षित आहे याची हे नियमितपणे पहावे, प्रत्येकाने अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला घेणे गरजेचे असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन जर पोलिसांनी केले तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल, यासाठी आवश्यक असेल ते सहकार्य क्लासेस चालक करतील असे यावेळी प्रा.गौरव गुंदेचा यांनी सांगितले. पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने आपल्यापर्यंत येऊन ही माहिती दिली. आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. बारामतीतील शैक्षणिक वातावरण चांगले असावे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी प्रा. शेषराव काळे केले.

Next Post

राज्यातील राष्ट्रवादीची फुट हे पवार कुटुंबाचे नाटक! चंद्रराव तावरे यांचा आरोप! भाजपलाही दिलाय घरचा आहेर! म्हणाले, भाजपने मोठी चूक केली, पक्षाचं नुकसान केलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group