भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झाले आहे दरम्यान मतदारांच्या याद्या आता छत्रपती कारखान्याची सत्ताधारी संचालक मंडळ आणि विरोधकांना दरम्यान वादाची ठिणगी ठरण्याची चिन्हे आहेत.
छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यादी महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमावलीमध्ये बिगर ऊस उत्पादक सभासद, थकबाकीदार सभासद व अ.प.क यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला असताना देखील कारखाना प्रशासन याच लोकांचा मतदार यादी मध्ये जाणून-बुजून समावेश करत आहे या कारणांमुळे पृथ्वीराज जाचक यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात पृथ्वीराज जाचक यांनी पत्रकारांना माहिती दिली ते म्हणाले, उद्या ता. ७ रोजी आपण छत्रपती कारखान्याचे कार्यालय बंद ठेवणार असून कोणतेही कामकाज करू देणार नाही. मतदार यादी नव्या नियमानुसार देणे करून प्राप्त आहे मात्र प्रशासन जाणीवपूर्वक जुन्याच याद्या पाठवत आहे महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार या याद्या पाठवल्या पाहिजेत तसेच यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मतदार यादी तयार करणे आवश्यक आहे मात्र जाणीवपूर्वक जुन्या नियमानुसार ही यादी दिली जात असल्याने आपण उद्या थेट कार्यालय बंद ठेवणार आहोत.
नव्या निर्णय रचनेनुसार मतदार याद्या पाठवणे बंधनकारक असतानाही जुन्या प्रारूपानुसार ही यादी पाठवण्यामागे नेमकी काय अडचण आहे समजत नाही, कोणाच्या पायाखालची वाळू सरकली आहे की, त्यामुळे ही मतदार यादी जाणीवपूर्वक नव्या तरतुदीनुसार पाठवली जात नाही तेच समजत नाही असा आरोप जाचक यांनी केला आहे.