महान्यूज : आजची गझल
अंतरीचे लोचनांनी बोलतो अस्फूट मी..
पण तिला कळतात कोठे हे इशारे रेशमी…
जाळले वाचून त्यांनी वृत्तपत्राला पुन्हा;
बोचली गर्वास त्यांच्या हाय माझी बातमी…
मी बळीराजाप्रमाणे टांगणीला लागतो..
वागणे राणी तुझे आहे किती हे मोसमी..?
ही कळेना कोठली माझी अवस्था ईश्वरा…!
“भोगुनी संन्यस्त अन् गुंतूनही मी संयमी…”
वाकलो नाही म्हणोनी राहिलो मागे सदा;
ते पुढे गेलेत सारे वाकले जे नेहमी….
गझलकार-अमित वाघ, अकोला
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











खूप सुंदर