नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले स्वामी अग्निवेश यकृताच्या आजारामुळे त्रस्त होते. त्यांना गेले काही दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
आज संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावू लागली आणि सायंकाळी 6 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असे रुग्णालयाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. डॉक्टरांनी त्यांना अधिकचे उपचार देण्याचा प्रयत्न केला. परंतु सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचे निधन झाले.
कामगार वर्गाच्या न्यायासाठी लढणारे धार्मिक नेते म्हणून स्वामी अग्निवेश परिचित होते. त्यांच्या निधनानंतर विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.










