इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज ३१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंदापूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १४५० वर पोचली आहे.
काल तपासणी झालेल्या व आज अहवाल आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये निरगुडे येथील १६ वर्षीय मुलगा, २५ वर्षीय युवक, १६ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
डिकसळ येथील ४५ वर्षीय पुरूष, शेटफळहवेली येथील ५८ वर्षीय महिला, लासुर्णे येथील ९८ वर्षीय पुरूष, सराटी येथील ३५ वर्षीय पुरूष, वरकुटे बुद्रक येथील ४५ वर्षीय महिला, नरूटवाडी येथील ५५ वर्षीय महिला, पिंपळे येथील ४० वर्षीय पुरूष, पळसदेव येथील ३८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर रामदास गल्ली येथील ५७ वर्षीय महिला, या महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. लासुर्णे येथील ३४ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरूष, १६ वर्षीय मुलगी, बोरी येथील ६५ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
न्हावी येथील २१ वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील ६२ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, ३४ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरूष, इंदापूर मेनरोड येथील १७ वर्षीय मुलगी, १४ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
सणसर येथील ३८ वर्षीय हॉटेल व्यावसायिक, काळेवाडी येथील ६९ वर्षीय महिला, ७८ वर्षीय पुरूष, ६२ वर्षीय महिला या रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.










