बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात सराफ, त्याचा मुलगा, पोलीस हवालदार, त्याची पत्नी व अन्य एका पोलीस हवालदारासह सहा जणांविरोधात महिलेने बलात्कार व फसवणुकीचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे बारामती शहरात खळबळ उडाली असून, 80 तोळे सोने घेऊन फक्त वीस लाख रुपये दिले आणि फसवणूक केली व बलात्कार केला अशा प्रकारची फिर्याद संबंधित महिलेने पोलिसांकडे दिली होती
या प्रकरणात गुन्हे शोध पथकातील वालचंद नगर येथे कार्यरत असलेले शिवाजी निकम तसेच त्यांची पत्नी कविता शिवाजी निकम आणि अकलूज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या श्रीकांत निकम या पोलीस हवालदारांविरोधात तसेच भरत ओसवाल व जीत ओसवाल या दोघा सराफ पिता पुत्रांविरोधात आणि समीर शेख यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये शिवाजी निकम व भरत वसवाल या दोघा विरोधात या महिलेने बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केला आहे तर सर्वच जणाविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. सोने परत देतो म्हणून खाटीक गल्लीतील शक्ती प्लाझा येथे बोलावून घेऊन आपल्यावर बलात्कार करण्यात आला अशी फिर्याद संबंधित महिलेने दिली.
दरम्यान आपल्याकडून 80 तोळे सोने घेऊन त्या बदल्यात फक्त वीस लाख रुपये दिले अशी फिर्यादी या महिलांनी दिली होती या प्रकरणात कविता निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम आणि समीर शेख यांनी आपल्याला गरुडबाग येथे बोलावून जातीवाचक शिवीगाळ केली व दमदाटी केली अशी देखील फिर्याद संबंधित महिलेने दिल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.