पंढरपुरातल्या शासकीय महापूजा दरम्यान मुखदर्शन सुरू ठेवणार; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
बारामती : महान्यूज लाईव्ह
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली होती, त्यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज या संदर्भात माहिती दिली.
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी अकलूजला आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामतीमार्गे मुंबईला प्राण केले. त्यावेळी बारामतीतील शासकीय विश्रामगृहात ते काही काळ थांबले होते. तेथे पत्रकारांशी बोलताना या विषयावर त्यांनी अधिक माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. याशिवाय व्हीआयपींच्या गर्दीमुळे वारकऱ्यांना दर्शन घेता येत नव्हते, मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन लावून वारकऱ्यांना शासकीय महापूजा पाहता येणार आहे. त्यामुळे भाविकांना अडचण होणार नाही.
तसेच मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या व्हीआयपींना दर्शन दिले जाईल, मात्र इतर व्हीआयपींचे दर्शन त्या दिवसात बंद राहील अशी आश्वासन विखे पाटील यांनी दिले आहे.