राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौड : दौंड तालुक्यातील वरवंड येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन आत्महत्या करुन कुटुंबच संपवलं.. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून सोडला.
डॉ. अतुल शिवाजी दिवेकर ( वय ४२) पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९), अदिवत अतुल दिवेकर ( वय ९) वेदांती अतुल दिवेकर (वय ६) अशी यांची नावे आहेत. ही घटना आज मंगळवारी (दि २०) घडली. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
डॉ. दिवेकर यांनी प्रथम पत्नीचा खून केला. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ते घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातील विहित नेऊन टाकली आणि घरी जाऊन आत्महत्या केली. याबाबत त्यापुर्वी त्याने चिठ्ठी लिहिल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटस आणि यवत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन लहान मुले अद्याप सापडली नसून त्यांचा शोध ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस विहिरीचे पाणी काढून सुरू आहे. ही घटना कशामुळे झाली याबाबत अद्याप कारण समोर आलं नाही पोलीस तपास करीत आहेत.