भोर : महान्यूज लाईव्ह
आज पुणे सातारा महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात एसटी कंटेनर ची धडक झाली आणि दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. कंटेनर आणि बस विचित्र पद्धतीने धडकल्याने ही घटना घडली.

कंटेनर पुण्याच्या दिशेने येत असताना या कंटेनरला बसने पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेने बस उलटली आणि बसमधील चालक आणि एका नववर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. याच दरम्यान बस कंटेनरला आणि कंटेनर शिवशाही बसला धडकला. पुणे सातारा महामार्गावर वरवे या भोर तालुक्याच्या हद्दीत हा दोन कंटेनर, शिवशाही बस व आराम बस यांच्या अपघाताचा हा क्षण होता.
या अपघातात ऋतुजा रवींद्र चव्हाण (वय ९ वर्ष रा. खडकमाळ उत्तम नगर) ह मुलगी आणि कर्नाटकातील खाजगी श्रीकृष्ण ट्रॅव्हल्स चालक शिवराज कुमार या दोघांचा मृत्यू झाला. बस कर्नाटक येथून पुण्याकडे निघाली होती. प्रवाशांना नाश्ता करण्यासाठी बस थांबवण्याकरता चालकाने डाव्या बाजूस वळवली आणि त्याचवेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरने या बसला जोराची धडक दिली.
त्यामुळे ही बस महामार्गावरच पलटी झाली. त्यानंतर हा कंटेनर सातारा बाजूकडे असलेल्या महामार्गावर घुसला व पुणे बाजूकडून येणाऱ्या आणखी एका कंटेनरला धडकला. त्यामुळे तोही कंटेनर पुन्हा शेजारून जाणाऱ्या शिवशाही बसला धडकला. यात या शिवशाही बसमधील ऋतुजा रवींद्र चव्हाण ही चिमुकली जागी मरण पावली.
या अपघाताय मिनाक्षी मायशेट्टी गौडा वय ३५,संजु रवी गौडा,वय २४,प्रदीप नज्जाप्पा गौडा वय २५ सर्व रा मुंबई, ऋतुजा हिची आई सुनंदा रवींद्र चव्हाण वय ४२ खडकमाळ, उत्तमनगर, रत्ना रवींद्र पुजारी वय ३८, रवींद्र रामा पुजारी वय ४१ ( दोघेही रा. ठाणे मुंबई ), विणा प्रभाकर गौडा वय ३४, ज्योती जयराम गौडा वय ३९,पर्वतमा देवे गौडा वय ४२, हेमा अण्णा गौडा वय ३५ सर्व रा. मुंबई हे सारे जण जखमी झाले आहेत.