बारामती : महान्यूज लाईव्ह
कन्हेरी येथील सुभेदार सुभानजी देवकाते यांच्या समाधीस्थळी स्मारक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला होता. यावेळी सुभेदार सुभानजी देवकाते यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती देणाऱ्या माहितीफलकाचेही उद्घाटन करण्यात आले.
सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते स्मारक समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बारामतीच्या नागरिकांना सरदार देवकाते यांची माहिती मिळावी आणि पुढे जाऊन देवकाते सरदारांचे उचित स्मारक उभे रहावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी समितीचे प्रमुख ॲड. गोविंद देवकाते यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार विजयराव मोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संपतराव देवकाते, छत्रपती सहकारी कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे ,डीपीडीसीचे सदस्य पांडुरंग कचरे ,भाजपाचे अध्यक्ष सतीश फाळके, बापूराव सोलंनकर ,देवेंद्र बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्याते मधुकर हाके आणि मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष सुरेश महानवर यांचे यावेळी सविस्तर मार्गदर्शन झाले
कार्यक्रमासाठी समितीचे ॲड. गोविंद देवकाते ,वसंतराव देवकाते ,अंकुश देवकाते, प्रकाश देवकाते, रमेश देवकाते, नितीन देवकाते आदींनी ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.