सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : जागतिक सायकल दिन, इंदापूर सायकल क्लबचा चौथा वर्धापन दिन, व जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने इंदापूर सायकल क्लब, यांच्या वतीने पतंजली योग समिती व सायकल प्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी सायकल वापरा प्रदूषण टाळा, निरोगी रहा.. झाडे लावा झाडे जगवा.. तसेच आरोग्य विषयक घोषणा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशी माहिती सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोहिते यांनी दिली
यावेळी सायकल क्लबचे सदस्य दशरथ भोंग, रमेश शिंदे, डॉक्टर शेंडे, प्रशांत सिताप, अवधूत पाटील, अस्लम शेख, ज्ञानदेव डोंगरे, महेबुब मोमीन, चाॅंद पठाण,ऋषिकेश कोथमिरे, आबा जगताप, मारकड भाऊसाहेब, अण्णा चोपडे, प्रशांत गिड्डे, शरद झोळ, पियूष बोरा, इंद्रनील घेरडे, सचिन चव्हाण, सचिन परबते, अहिल्या शिंदे, आर्या मोहिते, श्रावणी भोसले, संस्कृती पाटील इत्यादी उपस्थित होते.