भुवनेश्वर : महान्यूज लाईव्ह
ओडीसाच्या बालासोर मध्ये कोरोमंडल एक्सप्रेस आणि बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस चा झालेल्या अपघातात तब्बल 288 जणांचा मृत्यू झाला. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं कारण रेल्वेने नमूद केलं होतं. एकापाठोपाठ एक तीन रेल्वे एकमेकांना धडकल्या. हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे झाल्याचा दावा रेल्वेमंत्र्यांनी करत यातील चुकीचा सिग्नल ज्यांनी दिला त्याची ओळख पटली असल्याचा दावा केला आहे.
एकंदरीत 51 तासानंतर येथील रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्यानंतर आता केंद्र सरकारने हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे आणि यातील घातपाता जबाबदार असलेल्या व्यक्तींची माहिती समजली असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली असल्याने आता याला जबाबदार कोण? याची उत्सुकता वाढली आहे.
कोरोमंडल एक्सप्रेस चा वेग तब्बल 130 किलोमीटर प्रति तास असा होता. या रेल्वेच्या चालकाला बहनगा बाजार या ठिकाणी हिरवा सिग्नल मिळाला. ही रेल्वे वेगात असल्याने काही घडण्यापूर्वीच मेन लाईन वर जाण्याऐवजी लूक लाईन वर गेली आणि या लाईनवर मालगाडीला कोरोमंडल एक्सप्रेस ने जोरदार धडक दिली.
ही धडक बसल्याबरोबर तब्बल २१ डबे रुळावरून घसरले. काही डबे मालगाडीवर चढले, तर काही डबे मेन लाईनच्या दिशेने गेले आणि त्याचवेळी मेन लाईन वरून बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस येत होती. या एक्सप्रेसने या डब्यांना धडक दिली आणि अशा रीतीने तब्बल तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्या.
रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन मालगाडीमध्ये लोहखनिज होतं, त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचं स्पष्ट केलं. सिग्नलिंगमध्ये काही समस्या होत्या असेही त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याला जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटली असून या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस रेल्वे बोर्डाने केल्याची माहिती त्यांनी दिली.
रेल्वे चालकाच्या चुकीमुळे हे अपघात घडला नसून यंत्रणेतील बदलामुळे हा अपघात झाला आहे त्यातील गुन्हेगार व्यक्ती निश्चित झाल्या असून त्यांची सीबीआय चौकशी होईल सिग्नल यंत्रणेतील इलेक्ट्रिक पॉईंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग मधील बदल्यामुळे हा अपघात घडला यंत्रणेतील पॉईंट मशीन ची सेटिंग का बदलली होती हे चौकशीतून समोरील असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.