दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील ओझर्डे गाव आर्थिक, सामाजिक, शैक्षणीक, सहकार, धार्मिक आणि पौराणिक क्षेत्रातील एक नामवंत गाव म्हणून ओळखले जाते. राज्य शासनाने कुशल प्रशासक पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंत्तीचे औचित्य साधून त्यांच्या नावाने राज्यातील प्रत्येक गावाप्रमाणे ओझर्डे गावात कर्तृत्ववान महिलांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरव केला. ओझर्डे ग्रामपंचायतीने आयोजीत केलेला हा कार्यक्रम नक्कीच महिलांना प्रेरणादायी ठरेल असे मत वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांनी व्यक्त केले
समाजात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांची समाजाला ओळख व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंत्तीचे औचित्य साधून त्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला. येथे ७० महिला बचत गट आहेत. त्यात ७५० महिलांच्या हाताला काम मिळत आहे ही बाब कौतुकास्पद आहे असे मत त्यांनी व्यक्त केले
ओझर्डे ग्रामपंचायतीने सरकारी आदेशाचे पालन करुन राज्य शासनाचा यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळालेल्या शीतल यशवंत पिसाळ, कल्पतरू स्वयम साहेता
महिला बचत गटाच्या सौ .पल्लवी संतोष पिसाळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा पुनम धनाजी पिसाळ या विविध क्षेत्रातील ३ महिलांना उपविभागीय
पोलिस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचीम यांच्या हस्ते प्रमाणपत्र रोख रक्कम, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव व सत्कार केला.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य शेखर फरांदे, चंद्रकांत रिठे, सुरेखा क्षीरसागर, माधुरी घार्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पिसाळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी निकम, उपाध्यक्ष रामभाऊ पिसाळ, माजी सरपंच शुभांगी पिसाळ, तानाजी सोनावणे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शेखर फरांदे,प्रमोद सोनावणे,हणमंत कदम,सुरज कुंभार, सौ.संध्याराणी सोनावणे यांनी नियोजन केले.