दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : शहरातील आंबेडकरनगर मधील 35 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतात शेळ्या चालण्यासाठी गेला असता विजेचा धक्का बसल्याने ही दुर्घटना घडली.
महावीर कांतीलाल शिंदे (वय ३५ ) असे मृताचे नाव असून ते शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. त्या ठिकाणच्या बांधावर उंबराचे झाड होते. त्यावर चढून ते हातात कुऱ्हाड घेऊन शेळ्यांना पाला काढत होते. या झाडाच्या तिथूनच विजेच्या तारा गेल्या होत्या. या विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असल्याचे लक्षात आले नाही.
त्यांचा हात त्या तारांना लागून वीजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी फौजदार स्नेहल सोमदे, के. डी. पवार, हवालदार दगडे, धायगुडे, राठोड, पवार, वायदंडे आदींसह घटनास्थळी भेट दिली.