दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
कराड सातारा महामार्गावर बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुरियर घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपचा पाठलाग करीत अज्ञात चोरट्यांनी त्यामधील लाखो
रुपयांच्या सोन्या चांदीच्या विटा चोरुन नेल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .
याबाबतची संपूर्ण माहिती अद्याप हाती आलेली नाही परंतु घडलेल्या या घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोल्हापूरहून पुण्याकडे कुरियर घेऊन ही पिकअप निघाली होती. तिचा पाठलाग चोरट्यांनी उंब्रजपासून रात्री दोन वाजता सुरु केला.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अतीत गावाजवळ चोरट्यांनी ही गाडी थांबवली. त्यामधील लाखो रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या विटा घेऊन चोरटे पसार झाले. महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे
सातारा पोलिस दलात खळबळ उडाली. अर्थात या पिकअप जीपमधून सोन्या चांदीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्याशिवाय असा प्रकार होणे शक्य नाही अशी देखील चर्चा परिसरात सुरू आहे.