महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांखाली एनसीबीने मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
मुंबई मधील भायखळा तुरुंगात रियाची रवानगी करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर रियाला सामान्य बॅरेक मध्ये ठेवण्यात आले आहे. रियाची रवानगी तुरुंगात झाल्यानंतर आता रियाला तुरुंगात पहिल्या दिवशी कोणतं जेवण देण्यात आल हे देखील समोर आल आहे.
रियाला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणे ठेवण्यात आले आहे. तिला एक चादर, चटई, बेडशीट आणि साहीत्य ठेवण्यासाठी एक पिशवी देण्यात आली आहे. तसेच रियाला इतर कैद्यांप्रमाणेच जेवण देण्यात येत आहे. या जेवणामध्ये दोन पोळ्या,एक वाटी भात,एक वाटी वरण आणि एक भाजी यांचा समावेश आहे.










