दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील मस्तानी तलावात पोहायला गेलेला युवक बेपत्ता झाला असून सहा तासांपासून स्थानिक ग्रामस्थांची शोध मोहीम सुरू आहे. शाहीद अन्सारी ( वय २४, सध्या रा. पाटस ता. दौंड. जि. पुणे) असे या युवकाचे नाव आहे. मंगळवारी ( दि.१६) सकाळी ९ वाजण्याच्या आसपास ही घटना घडली.
याबाबत मिळालेले प्राथमिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्ग लगत असलेल्या मस्तानी तलावात हॉटेल आदिती येथील टायर पंचर काढणाऱ्या व्यवसायांची दोन तरुण हे मस्तानी तलावात पोहायला शिकण्यासाठी टायरची ट्युब घेऊन पाहण्यासाठी उतरले होते.
तलावात काही अंतरावर गेल्यावर दोघेही ट्युबवरून पाण्यात पडले. यामधील एका तरुणाला थोडेफार पोहता येत असल्याने तो पोहत बाहेर आल्याने तो बचावला, मात्र त्याचा जोडीदार हा पाण्यात पडला. याबाबतची माहिती ग्रामस्थांना समजल्याने ग्रामस्थांनी व युवकांनी तत्काळ तलावात उडी टाकून त्याचा शोध घेतला.
घटनेची माहिती मिळतात पाटसचे हवालदार संजय देवकाते, पोलीस शिपाई टकले घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील तरुणांनी मस्तानी तलावात त्या तरुणाचा शोध घेतला, मात्र सहा तास उलटूनही बेपत्ता युवकाला शोधता आले नाही. दरम्यान, पुणे येथील आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले आहे.