राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
11 एप्रिल रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काही उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यामध्ये दौंड पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या जागी मिनाज मुल्ला यांची नियुक्ती केली होती, परंतु काय चक्र फिरली; माहित नाही! 13 एप्रिल रोजी याच मिनाज मुल्ला यांच्या बदलीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.
राज्यामध्ये मनपसंत अधिकारी असावेत यासाठी मंत्रालयात बऱ्याच चर्चा सुरू असल्याची जी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, त्याचे संकेत अगदी तालुक्यात आणि गावागावातही मिळू लागले आहेत.
13 एप्रिल रोजी राज्य सरकारने मिनाज मुल्ला यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या बदलीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती दिली आहे. यासंदर्भात शासनाचे सहसचिव डॉक्टर माधव वीर यांनी आदेश काढला असून, मिनाज मुल्ला यांच्या बदलीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती दिली आहे