मुंबई – महान्यूज लाईव्ह
गेल्या तीन-चार दिवसांपासून ज्या माध्यमांनी अहोरात्र बातम्यांचा रतीब घातला, त्या बातम्यांवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाणी ओतले. अजित पवार यांनी गर्भीत इशारा देत ज्या बातम्या पसरवल्या, विपर्यास करून दाखवल्या जात आहेत, त्यातून आमचे जवळचे कार्यकर्ते नाउमेद होत आहेत, त्यांचाही संयम, सहनशीलता संपतेय, त्याचा अंत होऊ देऊ नका असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, कोणतीही आमदारांची बैठक बोलावलेली नाही आणि मी पक्षााच अध्यक्ष या नात्याने असे काहीही घडलेले नाही असे सांगून यापुढे याबाबत कोणत्याही बातम्या पसरवू नका असे सांगितले.
त्यानंतर दुपारी अजित पवार पत्रकारांना भेटले. त म्हणाले, मी मुंबईत विधानसभेत आहे. राष्ट्रवादीचे आमदारही मुंबईत आहेत. मी भाजपमध्ये जाण्याच्या केवळ अफवा आहेत, त्यामुळे आता या गोष्टी थांबवा व त्याचा तुकडा पाडा. आम्ही राष्ट्रवादी एक परिवार म्हणून काम करतो आहोत. पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. त्यामुळे जीवात जीव असेपर्यंत आम्ही पक्षाचंच काम करीत राहू.
दुसरीकडे अजितदादांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी फक्त आपापल्या पक्षाबद्दल बोलावे, मी आता त्या त्या पक्षाच्या प्रवक्त्यांना सांगणार आहे. असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अजित पवार बाहेर पडणार, त्यांना ४० आमदारांचा पाठींबा आहे. ते मुख्यमंत्री होणार, शिंदे गट अस्वस्थ अशा बातम्या तुम्ही पेरता आहात. आता मी काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे उद्विग्नपणे अजितदादांनी सांगितले आणि सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.