दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत येथील कु. सलोनी तीलकसिंग टाक (१०) ही खेळायला गेलेली मुलगी बेपत्ता झाली आहे. ही माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
यवत येथील मुलगी सलोनी टाक ही मुलगी खेळायला जाते असे सांगून घराबाहेर पडली, ती घरी परत आलीच नाही. तिच्या पालकांनी आजूबाजूला व परिसरात शोध घेतला असता ती मिळाली नाही. तिचा शोध नातेवाइकांच्या घरी तसेच चौफुला, केडगाव, भांडगाव, खोर या गावातही घेतला, मात्र ती सापडली नाही.
तिची आई सुनिता कौर तीलकसिंग टाक यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सलोनी हीचा रंग- गाोरा, चेहरा- गाोल, केस-काळे , उंची -अंदाजे 4 फुट, अंगात नेसणीस- निळे रंगाचे कुर्ता व निळे रंगाची पॅन्ट असून तिला – मराठी व हिंदी बोलता येते.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी या मुलीच्या घरी जाऊन सखोल चौकशी करत माहिती जाणून घेतली. या मुलीचा शोध यवत पोलीस करीत असून या मुलीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तातडीने यवत पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.