दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील प्रकार!
दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे ते यवतदरम्यान खडकवासला कालव्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह वाहून आला. दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे आठ महिन्याच्या गरोदर असलेल्या अनोळखी महिलेचा हा संशायास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातुन गेलेल्या खडकवासला कालवा पुणे ते यवतदरम्यान असलेल्या कासुर्डी हद्दीत गुरुवारी (दि. १३) कासुर्डी येथील योगिता राहुल बनसोडे ही महिला कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेली असता कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात एका अनोळखी महिलेचा मृतदेह वाहून येत असल्याचे दिसले.
याबाबत या महिलेने पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांना कळवले. पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांनी तात्काळ यवत पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळवली. यवत पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पुणे येथील ससून रुग्णालयात हलवला. ही महिला आठ महिन्याची गरोदर असून सध्या तिचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात आहे. या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास तातडीने यवत पोलिस ठाण्याचे सहाय्य फौजदार सागर चव्हाण मो. ९१३००१८६८८ या नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन यवत पोलीसांनी केले आहे.