नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातच नव्हे तर देशाच्या राजकारणाला धक्का देणारी ठरली आहे. चार दिवसापूर्वीच उत्तर प्रदेश मधील माफिया अधिक अहमद याच्या मुलाला असदला एन्काऊंटर मध्ये उत्तर प्रदेशच्या एसटीएफ पथकाने मारल्यानंतर आता वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असलेल्या अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांवर अज्ञात व्यक्तींनी समोरासमोर गोळ्या झाडून मारले.
#WATCH | Uttar Pradesh: Moment when Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed were shot dead by assailants while interacting with media.
— ANI (@ANI) April 15, 2023
(Warning: Disturbing Visuals) pic.twitter.com/PBVaWji04Q
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची लाईव्ह हत्या करण्यात आल्याने उत्तर प्रदेश व देशभरात खळबळ उडाली आहे. या दोघांना पोलीस वैद्यकीय तपासासाठी घेऊन जात असतानाच हल्लेखोर त्या ठिकाणी आले. पत्रकार अतिकला प्रश्न विचारत होते, तेव्हाच हल्लेखोरांनी या दोघांवर गोळ्या झाल्या.
या दोघांनाही डोक्यात गोळ्या घालून मारण्यात आले. अर्थात पोलीस त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते, तेव्हा हल्लेखोरांना त्याचा सुगावा कसा लागला आणि पोलिसांना कसा लागला नाही? हा प्रश्न आता विचारला जात आहे.
अतिक अहमदच्या मुलाचा एन्काऊंटर केल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला अधिक अहमदला नेण्यात आले नव्हते. आज त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना पत्रकारांनी त्याला गाठले आणि त्याला प्रश्न विचारत असतानाच, तो काही उत्तर देणार तेवढ्यात गोळ्या झाडल्या गेल्या. 13 एप्रिल रोजी असद अहमद याचा एन्काऊंटर करण्यात आला होता.