कळाशी गावची कन्या प्रज्ञा सौदागर शिंदे हिचा कळाशी ग्रामस्थांनी केला सत्कार..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – कोरोनाच्या काळात कोरानाने वडिलांचे निधन झाले. अत्यंत परिस्थिती त जीवन जगणाऱ्या कळाशी गावची कन्या प्रज्ञा सौदागर शिंदे हिने संघर्ष करण्याला कधीच हार मानली नाही.कुटूंबाची जबाबदारी सांभाळत प्रज्ञाने पोलीस होण्याचा संकल्प केला. तिने यासाठी अपार मेहनत घेतली. पोलीस भरतीत ती यशस्वी झाली.
सोलापूर शहर पोलीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल काळाशी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. हलाखीच्या परिस्थितीशी सामना करत गावच्या कन्येने यश मिळविल्याने कळाशी ग्रामस्थांनी प्रज्ञा शिंदे हिचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना प्रज्ञा शिंदे हिच्या वडिलांचे कोरोना काळात कोरोनाने आकस्मित निधन झाले. लहान भाऊ आई स्वतः प्रज्ञा व आजी असा परिवार तिचा आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून कष्टाने व जिद्दीने पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला. केलेल्या प्रयत्नांना यश आले व त्याचे सोलापूर शहर पोलीस पदी नियुक्ती झाली.
या सत्काराच्या वेळी रयत क्रांती पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश देवकर, भाजप किसान मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल पाटील, अनिल सूर्यवंशी, बाळासाहेब जाधव, काकासाहेब देवकर, ज्ञानदेव करे, गजेंद्र देवकर, सतीश चव्हाण, चंद्रकांत बाबर, जालिंदर विपट, पोपट करे, जितेंद्र गिड्डे, धनाजी भालेकर, ग्रामपंचायत सदस्य विकास देवकर, संतोष गोलांडे, प्रतीक्षा शिंदे, बबन रेडके, हनुमंत बाबर, आजिनाथ मिसाळ, गोरख शिंदे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.