शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील कासारी हद्दीत बैलगाडा शर्यतीसाठी घेऊन आलेल्या बैलाने युवकाच्या पोटात शिंग खुपल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वृषाल राऊत असे मयत युवकाचे नाव आहे.याबाबत योगेश अरुण राऊत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश राऊत, दिनेश राऊत आणि ऋषाल राऊत सकाळी नऊ वाजता कासारी गावच्या हद्दीत बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा घेऊन गेले होते.
त्यावेळी बैलगाडा गाडीतून उतरवत असताना बैलाने वृषालच्या पोटात शिंग खुपसले. त्यावेळी जखमी झालेल्या वृषाल याला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी वृषाल राऊत हा मयत झाल्याचे सांगितले.
या घटनेची वार्ता कळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.