दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील राज्य राखीव दलाच्या दोन्ही गटामध्ये 29 जवांनासह 36 जण व यवत कोवीड सेंटरमध्ये 24 अशा एकुण 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शहरातील उपजिल्हा रुग्णालय कोवीड सेंटर मध्ये आज (सोमवारी) 209 जणांची रॅपीड अँन्टिजेन तपासणी करण्यात आली. त्यापैकी 36 व्यक्तीचे अहवाल पाँझिटिव्ह तर 173 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ, संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. यामध्ये 5 ते 31 वयोगटातील 31 पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. दौंड शहरात सहा तर ग्रामीण भागात एक व राज्य राखीव गट क्रमांक पाच मध्ये 24 व राज्य राखीव गट क्रमांक सात मध्ये पाच असे एकूण 36 जण नव्याने कोरोना बाधीत आढळले आहेत.
तसेच यवत कोवीड सेंटर मध्ये काल 102 जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी 24 जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह तर 78 जण निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 10 ते 62 वयोगटातील 13 पुरूष व 11 महिलांचा समावेश आहे.
यात यवत येथे दोन, राहु चार, वरवंड तीन, भरतगाव चार, देऊळगाव गाडा दोन, बोरीभडक सहा, केडगाव, सहजपुर, बोरीपार्धी प्रत्येकी एक असे 24 कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत. यवत उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॅा.शशिकांता इरवाडकर यांनी ही माहिती दिली.










