दिल्ली : महान्यूज लाईव्ह
घटना मध्यप्रदेशातील असली, तरी देशातल्या सर्व भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात या घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. काही बायका जीवाला कंटाळल्यात. छोट्या छोट्या कुरबुरी वरून आता त्यांना सहन होत नाही, मात्र त्या फक्त स्वतः जीव देत नाहीत , तर स्वतःबरोबर वंशाचे दिवे देखील घेऊन जात आहेत. मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर भागात घडलेल्या या घटनेमध्ये बाई तर वाचली, पण तीन चिमुरड्यांना मात्र आपला जीव गमवावा लागला.
बुऱ्हानपूर जिल्ह्यातील पालदा गावात ही घटना घडली असून प्रमिला भिलाला नावाच्या महिलेने चार मुलांना बरोबर घेऊन विहिरीत उडी मारली. त्यापैकी दीड वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाच्या मुलाने या विहिरीतच आपला जीव सोडला.
मात्र विहिरीत उडी घेतल्यानंतर प्रमिला हिला मात्र भीती वाटली आणि तिने एका मुलीला बरोबर घेऊन रस्सीला पकडलं आणि स्वतःचा जीव मात्र वाचवला. या घटनेनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांनीही या ठिकाणी भेट दिली, मात्र या घटनेने संपूर्ण जिल्ह्यातच खळबळ उडाली आहे.