माळेगाव कारखाना निवडणुक
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. राष्ट्रवादीकडून जवळपास २०० जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी सर्वसामान्य नागरीकांच्या भेटीगाठी घेत त्यांची विविध कामे मार्गी लावली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान येथील विविध कामांचा आढावा घेवून सहयोग भवन येथील बैठकीस हजेरी लावली.
दुपारी १२ वाजल्यापासून सहयोग या निवासस्थानी अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.










