दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडच्या ग्रामीण भागात यवत येथील कोवीड सेंटरच्या अहवालात 82 पैकी 27 जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला.
यवत ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॅा.शशिकांत इरवाडकर यांनी माहिती दिली. कोरोना बाधीत व्यक्तिंच्या संपर्कातील शनिवारी (ता. 29 ) 82 जणांची कोरोना तपासणी केली.
यामध्ये यवत येथे आठ, वाखारी पाच, बोरीपार्धी दोन, लडकतवाडी चार, बोरीऐंदी एक, कोरेगाव भिवर तीन, केडगाव एक, राहु एक, दौंड एक असे एकुण 27 जण नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत.
3 ते 72 वयोगटातील 16 पुरूष व 11 महिला यांचा समावेश आहे. दरम्यान दौंडच्या पश्चिम भागात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. यवत, वाखारी, लडकतवाडी व राहु आदी गावात कौटूंबिक संसर्ग वाढत असून रूग्णांची संख्या वाढल्याने या गावांची धाकधुक वाढली आहे.










