इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा कमी होण्यास तयार नाही. आजदेखील खाजगी व सरकारी विविध तपासण्यांमध्ये 27 जण कोरोना बाधित आढळले असून, अद्याप 134 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान दुर्दैवाची बाब अशी की तालुक्यात आज दोन जणांचा बळी घेतला.
इंदापूर तालुक्यात आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बावडा येथील 39 वर्षे पुरुष, इंदापूरच्या कारागृहात पुन्हा एकदा आणखी एक कोरोनाग्रस्त आढळला असून 32 वर्षीय कैद्यास कोरोनाची लागण झाली आहे. वालचंदनगर येथील गुलमोहर सोसायटी येथील एका कुटुंबातील तिघाजणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये नऊ वर्षीय मुलगी, 34 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 1 येथे हे दोन जण कोरोनाबाधित आढळले असून यामध्ये ते 65 वर्षीय महिला व 23 वर्षीय युवकाचा समावेश आहे. शास्त्री चौक इंदापूर येथे ते तीस वर्षीय पुरुष व 61 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील घोरपडवाडी येथील 55 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाली आहे.
तरंगवाडी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली असून निमगाव केतकी येथे 6 रुग्ण आढळले असून 38 वर्षीय महिला, तीस वर्षीय महिला व 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे. येथीलच काळामळा येथील 38 वर्षीय पुरुष, त्याबरोबर 22 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे.
इंदापूर शहरातील खडकपुरा येथील 41 वर्षीय पुरुष रूग्णास कोरोनाची बाधा झाली आहे. इंदापूर तालुक्यातील तावशी येथील साठ वर्षे पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील महती नगर येथील 65 वर्षीय महिला, माळवाडी नंबर 1 येथील 75 वर्षे पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
कळंब येथील 29 वर्षीय पुरुष, कालठण नंबर एक येथील 60 वर्षीय महिला, शेळगाव येथील 4 वर्षीय मुलासही कोरोनाची लागण झाली आहे. येथील लाखेवाडी येथील 25 वर्षीय महिला व 22 वर्षीय महिलेस लागण झाली आहे.
इंदापूर तालुक्यात ही कोरोनाचा मृत्यूदर वाढत असून आज पुन्हा एकदा दोन जणांचा कोरोना ने बळी घेतला. यामध्ये इंदापूर शहरातील एका महिला रुग्णाचा समावेश असून निमगाव केतकी येथील 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.










