पुणे सोलापूर महामार्गावर मळद जवळ थरार..
दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) हद्दीतील आज शनिवारी (ता. 29) रात्री आठच्या सुमारास सोलापूरकडे जाणाऱ्या मालवाहू टेंपो चालक रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी खाली उतरला आणि काही क्षणातच दोन काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी टेम्पो चालकाशी झटापट करून 30 लाख रूपये असलेली बॅग घेऊन फरार झाले.याप्रकारामुळे दौंड पोलीसांची झोप उडाली आहे.
संबंधित चोरटे पाटस टोल नाक्याच्या दिशेने गेलाचा संदेश दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिला असून पाटस पोलीस टोल नाक्यावर बारकाईने चेक करीत आहेत.
याबाबत माहिती अशी की, पुण्याकडून सोलापूरकडे एका कंपनीचा माल आणण्यासाठी जाणारा मालवाहू टेंम्पो (एमएच 12 एफसी 7799) मळद हद्दीत उड्डाण पुलाजवळ हाँटेल वृंदावन जवळ चालक लघुशंकेसाठी खाली उतरला, तेवढ्यात ३० लाख रकमेची पैशाची बॅक दोन काळया रंगाच्या पल्सरवरून आलेल्या चार अज्ञात चोरटय़ांनी चालकाशी झटपट करून पळवून पसार झाले आहे.
संबंधित चोरटे पाटस टोल नाक्याच्या दिशेने गेलाचा संशय असल्याने पोलीस या चोरटयांचा शोध घेत आहेत, दरम्यान या संशयीत दुचाकी व व्यक्ती अढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










