इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भाजपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दार उघड उध्दवा दार उघड या धार्मिक स्थळे उघडी करण्याच्या मोहिमेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी इंदापूर तालुक्यात भाग घेतला. निरा नरसिंहपूर येथे धार्मिक संघटनांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात भाग घेतला.
मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध धार्मिक संस्था, संघटना, धर्माचार्य, आणि प्रमुख देवस्थाने राज्य सरकारला इशारा देण्यासाठी आज शनिवारी (ता.२९) एकत्र आले. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरात धार्मिक अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने इंदापूर मधील नरसिंहपूर येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास भाजपाच्या वतीने पाठींबा देत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नरसिंहपूरमध्ये आरती करण्यात आली. यावेळी भजन म्हणून सरकारचे डोके ठिकाणावर आणावे असे देवाला साकडे घालण्यात आले. यावेळी भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
या घटनेचा व्हिडीओ येथे पहा, अथवा आमचे महान्यूज फेसबुक पेज लाईक करून पेजवरील व्हिडीओ पाहू शकता.
दरम्यान यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे सुरु करा, कोरोनाच्या नावाखाली मंदीरे बंद करण्यात आली. मात्र आता सहा महिन्यांहून अधिक काळ गेला असून हे सरकार निष्क्रिय ठरले आहे, आता लोकांच्या सहनशीलतेचा या सरकारने अंत पाहू नये असे मत त्यांनी व्यक्त केले.










