• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुधाच्या पट्ट्यात राजू शेट्टींचा 27 तारखेला एल्गार !आंदोलन बेदखल कराल, तर सरकार तुमच्या पाठीत म्हशीचं लोढणे घालू: राजू शेट्टींचा इशारा

Maha News Live by Maha News Live
August 25, 2020
in शेती शिवार, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

निवडणुकीच्या पूर्वी व निवडणुकीनंतर देखील ज्या महाविकास आघाडीशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुत जुळलेले आहे, त्याच महाविकास आघाडीच्या राज्यातील सत्तेच्या काळात माजी खासदार राजू शेट्टींनी पुन्हा एकदा बारामती लक्ष्य केली आहे, अर्थात यावेळी बारामती लक्ष्य करण्याचे कारण उसाचा दर नाही, तर दुधाचा दर आहे आणि दुधाचा पट्टा देखील आता बारामती इंदापूर आणि पुणे जिल्हा आहे.. त्यामुळे योग्य वेळी, योग्य ठिकाणी राजू शेट्टींनी हात घातला असून येत्या 27 ऑगस्ट रोजी बारामतीच्या प्रांत कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा नेला जाणार आहे.. अर्थात हे आंदोलन बेदखल कराल, तर ‘सरकार’ तुमच्या पाठीत हेच म्हशीचे लोढणे घालू असा घणाघाती इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकीय पंढरीतील वातावरण आंदोलनापूर्वीच तापले आहे.

राज्यातील दूध उत्पादकांची केंद्र सरकार व राज्य सरकार कडून अक्षरशः पिळवणूक सुरू असून 17 व 18 रुपये प्रति लिटर दर दुधाला मिळत आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर दूध उत्पादकांच्या हातात पडत असून त्यातून दूध उत्पादकांची फसवणूक होत आहे, मात्र दूध संघ मालक गब्बर होत आहेत. अशा परिस्थितीत दुधाची भुकटीची आयात केन्द्र सरकारने रद्द केली पाहिजे व राज्य सरकारने दुधाचा दर वाढवून दिला पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे.

मध्यंतरी भाजपने देखील हे आंदोलन चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकऱ्यांमधून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा उसानंतर बारामती लक्ष्य केली आहे. उसाच्या दराच्या आंदोलनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजकीय वर्चस्व राज्यात निर्माण झाले होते, त्यामुळे कोणतेही आंदोलन यशस्वी करायचे असेल तर, जेव्हा बारामतीकरांचे राज्य असते, तेव्हा बारामतीतच आंदोलन केले पाहिजे हे चाणाक्ष राजू शेट्टी यांनी ओळखले आहे.

जरी राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीशी सूत जुळले असले तरीदेखील आपल्या संघटनेचे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा बारामती गाठण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी दिवस निवडला आहे तो 27 ऑगस्ट रोजीचा..! महाराष्ट्रात खपल्या जाणाऱ्या व महाराष्ट्रात उत्पादन होणाऱ्या दुधाच्या जवळपास निम्मे दूध हे इंदापूर व बारामती तालुक्यात संकलित केले जाते आणि म्हणूनच हाच मुद्दा लक्षात घेत राजू शेट्टी यांनी बरोबर ठिकाणी घाव घालण्याचे ठरवले आहे.

यानिमित्ताने राजू शेट्टी यांनी दूध उत्पादकांना आवाहन केले आहे की, मी 27 ऑगस्ट रोजी बारामती येथे येणार आहे तुम्ही येणार का?

राजू शेट्टी यांनी केलेले आवाहन येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता

Tags: RAJU SHETTISwabhimani Shetakari Sanghatna
Next Post
छत्रपतीच्या निवडणूकीत यंदाही बिगर ऊस उत्पादक मतदान करणार!

छत्रपतीच्या निवडणूकीत यंदाही बिगर ऊस उत्पादक मतदान करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group