• Contact us
  • About us
Monday, October 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपतीच्या निवडणूकीत यंदाही बिगर ऊस उत्पादक मतदान करणार!

Maha News Live by Maha News Live
January 26, 2020
in राज्य
0
छत्रपतीच्या निवडणूकीत यंदाही बिगर ऊस उत्पादक मतदान करणार!

हरकतीच्या सुनावणीत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय

बारामती: छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीत बिगर ऊस उत्पादकांच्या मतदानास मतदानास कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सतीश काटे यांच्यासह काही सभासदांनी घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकारी धनंजय डोईफोडे यांनी फेटाळला आहे. मात्र 3512 दिवंगत सभासदांसह आठ सहकारी संस्थांना मतदानासाठी अपात्र ठरवले आहे.

छत्रपती कारखान्याच्या मतदारयाद्यांमध्ये 9 हजार 910 सभासद बिगर ऊस उत्पादक असून त्यांना मतदानाचा हक्क देऊ नये, यातील 3363 थकबाकीदार सभासदांना सहकारातील नियमानुसार मतदानास अपात्र ठरवले जावे अशी मागणी जाचक यांच्यासह 5 सभासदांनी केली होती, त्यावर धनंजय डोईफोडे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. आज त्यावर निर्णय देताना धनंजय डोईफोडे यांनी बिगर ऊस उत्पादक सभासदांना मतदानापासून अपात्र ठरविण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे यंदाच्याही निवडणुकीत बिगर ऊस उत्पादक सभासद मतदान करतील अशी अशी स्थिती निर्माण झाली आहे

छत्रपती कारखान्याची एप्रिल मध्ये संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्य़ा अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारखाना व सभासदांच्या वतीने केलेल्या युक्तिवादानुसार आर्थिक अडचणींमुळे हे सभासद अडचणीत आहेत. या सभासदांनी वेळोवेळी ऊस लागवड केलेली आहे, परंतु काही वेळा दुष्काळामुळे तर काही वेळा चारा छावण्यांमुळे त्यांना ऊस पुरवता आला नाही. कलम 26 ब नुसार हे सभासद अक्रियाशील ठरत नाहीत, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवू नये, या हंगामात त्यांची आर्थिक वसुली होईल, त्यांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत मिळायला हवी व त्यांचा मतदानाचा हक्क हिरावता कामा नये असा युक्तीवाद करण्यात आला, तर सहकाराच्या नव्या पोटनियमानुसार असे सभासद मतदानास अपात्र ठरतात. त्यामुळे त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा अशी मागणी जाचक व इतरांच्या वतीने करण्यात आली होती.

बिगर ऊस उत्पादकांचा संबंध काय?

बिगर ऊस उत्पादक सभासदांना प्रत्येक वर्षी 75 किलो साखर कारखान्याकडून मिळते. त्यामध्ये सवलतीच्या दरामुळे साखरेचा प्रतिकिलो 10 रुपयांचा फायदा या सभासदांना होतो. या सभासदांना पूर्वी शेती होती. मध्यंतरीच्या दोन दशकांमध्ये हे क्षेत्र नसलेले, थकबाकीदार असलेले सभासद बनले. परिणामी अनेकांनी आपली कर्जवसुली होऊ नये यासाठी ऊस घालणे बंद केले व ते बिगर ऊस उत्पादक सभासद झाले. बिगर ऊस उत्पादक हे कारखान्याच्या निवडणुकीत प्रभावी ठरतात. विरोधकांच्या मते या सभासदांना कारखान्याच्या हिताशी देणेघेणे नाही, त्यांना जो 10 रुपयांचा प्रतिकिलो साखरेचा फायदा होतो, त्यातून कारखान्याचा पाच वर्षात 3.93 कोटींचा तोटा होतो आणि हेच सभासद हित लक्षात न घेता आर्थिक व्यवहार करून सत्ताधाऱ्यांना मतदान करतात. यासंदर्भात परस्परविरोधी मुद्द्यांना पुढे करून विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले होते.

Tags: Election2020Sugar Industry
Next Post
पुणे जिल्ह्यात एफआरपी 150 कोटी थकीत, राज्यात 969 कोटी थकीत

पुणे जिल्ह्यात एफआरपी 150 कोटी थकीत, राज्यात 969 कोटी थकीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group