महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
आवाजावरून कोरोना तपासण्याचा प्रयोग मुंबईत सुरू करण्यात आला असून गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्रात ही आर्टीफिशीयल इंटेलिजन्स तपासणी सुरू करण्यात आली आहे.
तुमच्या आवाजावरून व्होकलेस हेल्थकेअरद्वारा तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही हे ओळखले जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यामध्ये उपयोग करून घेण्यात आला असून गोरेगावमध्ये यासाठी व्हाईस बायोमेकर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू झाला असून या वेगळ्या प्रकारच्या तपासणीचा उपक्रम हाती घेण्यातआला असला तरी रॅपिड अॅंटीजेन तपासणी तसेच आर्टीपीसीआर तपासण्याही सुरूच राहणार आहेत.
मात्र आवाजावरून कोरोना झाला की नाही हे ओळखणारे हे तंत्र यशस्वी झाल्यास ते अफलातून प्रयोगाचे तंत्र ठरणार आहे हे नक्की..मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा प्रारंभ केला.











