दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटर मध्ये काल शुक्रवारी (ता. २१ ) एकुण ५० जणांचे कोरोना विषाणू ची तपासणी साठी पाठवण्यात आले होते, ५० पैकी १५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
उर्वरित ३५ जण कोरोना निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. पाँझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये २ ते ६३ वयोगटातील १० महिला व पाच पुरुष आहेत. शालिमार चौक, भवानीनगर एक, बालाजीनगर एक, बोरावके नगर चार, जगदाळे वस्ती तीन, साठेनगर एक,
सावरकरनगर तीन, तर राज्य राखीव दल गट क्रमांक ५ मध्ये एक अशा १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान दौंडच्या ग्रामीण भागात आज सकाळपर्यंत २५ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आला होता. यामध्ये पंधरा जणांची भर पडली आहे.











