दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधीत गावात आज २५ जणांचा कोरोना तपासणी अहवाल हा पाँझिटिव्ह आला आहे अशी माहिती तालुका अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी दिली.
शुक्रवारी ( दि. २१ ) कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील १०१ जणांची कोरोना ची तपासणी यवत व स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर येथे करण्यात आली, १०१ पैकी उर्वरित ७६ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे एका डॉक्टरसह चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तसेच उंडवडी चार, वाळकी तीन, यवत पाच, देऊळगाव राजे दोन, बोरीपार्धी तीन, नानवीज, वरवंड, डाळींब,डुबेवाडी प्रत्येकी एक असे एकूण २५ जण ७ ते ७० वयोगटातील २१ पुरुष व ४ महिला यांचा समावेश आहे.
शहरातील कोवीड सेंटरचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. मात्र काल दौंड शहरातील कोवीड सेंटर मध्ये ६२ पैकी पाच जणांना कोरोना ची बाधा झाली होती.











